एकदा बादशाह अकबर आणि बिरबल यमुनेच्या काठी फिरायला गेले. यमुणेकाठाच्या वाळूवर चालत असताना बादशहाला एक युक्ति सुचली बादशहाणे जवळ असलेली एक काठी घेतली आणि वाळूवर एक रेश मारली आणि आपल्या बरोबरच्या सर्व सरदारांना म्हणाला तुमच्यापैकी कोणी या रेषेला आणि वाळूला हात न लावता छोटी करून दाखवू शकत का. सर्व सरदार त्या रेषेकडे बघून विचार करू लागले. अकबर न बिरबला कडे बघीतले आणि म्हणाला बिरबल जी तुम्हाला काही सुचतय काय. बिरबल म्हणाला हो खविन्द त्यात काय येव्हडे, बिरबलाने वाळूवर पडलेली काठी उचलली आणि त्या रेषेच्या बाजूला त्या रेषेपेक्षा मोठी रेषा काढली आणि म्हणाला महाराज या रेषेपैकी कोणती रेषा मोठी आहे. हा.. हा .. अकबर हसला आणि म्हणाला बोहत आछे बोहत आछे बिरबल, तुला मी जो प्रश्न विचारला त्यातली खरी गोम लक्षात आली. माझ्या रेषे पेक्षा मोठी रेषा शेजारी काढून तू आपोआपच माझी रेष लहान ठरवली अन तेही माझ्या रेषेला धक्का न लावता. बिरबलाची ही युक्ति एकूण आजूबाजूचे मात्र खजील झाले. कारण त्यांना जे सुचलं नव्हत ते बिरबलाने एका झटक्यात करून दाखवले.
असा होता चतुर बिरबल
#अकबरबिरबलगोष्टी
#रेषलहानझाली
#AkbarBirabal
#StorieResh lahan zali
#बादशाह अकबर
#Akbar Birabal
#marathigoshti

